Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पूजा खेडकर प्रकरण दिल्लीत पोहोचले; थेट पीएमओनं लक्ष घातलं

पूजा खेडकर प्रकरण दिल्लीत पोहोचले; थेट पीएमओनं लक्ष घातलंमुंबई : खरा पंचनामा

ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरची मनमानी आणि मिजासगिरीच्या आरोपानंतर पुण्याहून वाशिमला बदली करण्यात आली. 32 वर्षीय पूजा खेडकर महाराष्ट्र केडरची 2023 च्या बॅचची IAS अधिकारी आहे.

भारतीय प्रशासकीय सेवांमध्ये स्थान मिळवण्यासाठी तिने शारीरिक अपंगत्व श्रेणी आणि इतर मागासवर्गीय (OBC) कोट्यातील लाभांचा गैरवापर केला आहे. दरम्यान, काल (10 जुलै) पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा अहवाल मागिला आहे. मसुरीस्थित लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन (LSBNAA), जे नागरी सेवा उमेदवारांना प्रशिक्षण देते, खेडकर यांच्या विविध आरोपांवरून राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे. अकादमीचा अंतिम अहवाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवला जाईल.

LSBNAA चे उपसंचालक शैलेश नवल यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या मान्यतेनंतर राज्याच्या सामान्य प्रशासनाला अहवाल पाठवण्यास सांगितले आहे. मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर त्यांच्या परवानगीशिवाय सौनिकच्या केबिनमध्ये प्रवेश केल्याची माहिती आहे. सौनिक यांनी एका हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार "ती वेळ न मागता आत आली, त्यानंतर मी तिला जाण्यास सांगितले आणि सामान्य प्रशासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांना भेटायला सांगितले कारण माझे कामाचे वेळापत्रक व्यग्र आहे." दरम्यान, पूजाची बदली झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी पूजा आज वाशिममध्ये कर्तव्यावर रुजू झाली आहे.

कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या सेवा वाटप यादीनुसार, पूजाने OBC आणि PWBD (बेंचमार्क अपंग व्यक्ती) श्रेणी अंतर्गत अखिल भारतीय रँक 821 सह IAS श्रेणी घेतली आहे. विशेष म्हणजे, पूजाने ओबीसी प्रवर्गांतर्गत अर्ज केला होता. ज्यात क्रिमी लेयर प्रमाणपत्रासाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ₹8 लाख आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.