Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

माझ्या मतदारसंघात पाय ठेवाल तर जागेवरच बदली करून टाकेन भाजप आमदाराचा पोलिसांना सज्जड दम

माझ्या मतदारसंघात पाय ठेवाल तर जागेवरच बदली करून टाकेन
भाजप आमदाराचा पोलिसांना सज्जड दमऔसा : खरा पंचनामा

माझ्या मतदारसंघात अजिबात फिरकायचं नाही. गरीबांना लुटाल तर जागेवरच बदली करून टाकेन, असा सज्जड दम भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांना दिलाय. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. त्यामुळे याच मुद्द्याला हाताशी धरून विरोधक सरकारला चांगलंच धारेवर धरण्याची शक्यता आहे.

आमदार अभिमन्यू पवार हे लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लातूर- सोलापूर महामार्गावर वाहतूक पोलिसांकडून वाहनाची तपासणी सुरू होती.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलीस कारवाई करीत होते. तसेच वाहनचालकांनी थकवलेला दंडही वसूल करण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी एका वाहनचालकाने फोन करून आमदार अभिमन्यू पवार यांना बोलावून घेतलं.

कार्यकर्त्यांना आर्थिक भूर्दंड बसून नये म्हणून या आमदार महोदयांनी तातडीने पदाधिकाऱ्यांसह लातूर-सोलापूर महामार्गाकडे धाव घेतली. यावेळी कर्तव्यावर असलेल्या
पोलिसांशी आमदार पवार यांनी हुज्जत घातली. माझ्या मतदारसंघात फिरकायचं नाही, असा दम त्यांनी वाहतूक पोलिसांना दिला. इतकंच नाही तर गरीबांना लुटाल तर जागेवरच बदली करून टाकेन, असा धमकीवजा इशाराही आमदार अभिमन्यू पवार यांनी पोलिसांना दिला.

धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी पोलिसांना अरेरावीची भाषा देखील वापरल्याचं व्हिडीओत दिसून येत आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सत्ताधारी भाजपचे आमदार अशा प्रकारे वाहतूक पोलिसांना धमकावत असतील, तर सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा सवाल अनेकजण उपस्थित करीत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.