Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सातारा पोलीस अधीक्षकांना उच्च न्यायालयात हजर होण्याचे आदेश बंटी-बबली तपास, कोरोना काळातील आ. गोरे भ्रष्टाचार प्रकरण

सातारा पोलीस अधीक्षकांना उच्च न्यायालयात हजर होण्याचे आदेश 
बंटी-बबली तपास, कोरोना काळातील आ. गोरे भ्रष्टाचार प्रकरणअनुजा कारखेले
सातारा : खरा पंचनामा

सातारा जिल्ह्यात सध्या दोन प्रकरणे चांगलीच गाजत आहेत, एक पंतप्रधान कार्यालयात सुरक्षा सल्लागारपदी कार्यरत असल्याची बतावणी करून अनेक लोकांना गंडा घालणारी साताऱ्यातील जोडी काश्मिरा पवार व गणेश गायकवाड या दोघांच्या सातारा पोलिसांच्या तपासाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने शंका उपस्थित केली आहे. याप्रकरणी सातारा पोलीस अधीक्षकांना दि. 11 जुलै आणि कोरोना प्रादुर्भाव रुग्णांना जिवंत दाखवून आ. जयकुमार गोरे व इतरांनी कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे, याप्रकरणी दिनांक 22 जुलै रोजी उच्च न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश सातारच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, 10 जानेवारी 2023 रोजी काश्मिराच्या तक्रारीनंतर सातारा पोलिसांनी भांबळ गोरख मरळ आणि आणखीन एका व्यक्तीविरुद्ध 50 लाख रुपयांची मागणी केल्याबद्दल आणि त्यांच्यातील आर्थिंक वादानंतर तिच्याकडूंन ५० हजार रुपये जबरदस्तीने घेतल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल केला. भांबळ यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणले की, मी तक्रारदार असताना पोलीस कर्मचारी राहुल घाडगे यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. मला सातारा पोलिसांची भूमिका ही संशयास्पद वाटली आणि या प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा सीबीआयकडे वर्ग करावा अशी विनंती करणारी फौजदारी याचिका मुंबई उच्च न्यायालयासमोर दाखल केली. 

या सुनावणी दरम्यान न्यायालयाने सातारच्या पोलीस अधीक्षकांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर दुसरे प्रकरण म्हणजे कोरोना प्रादुर्भावात रुग्णांना जिवंत दाखवून आ. जयकुमार गोरे व इतरांनी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करणारी याचिका मायणी (ता. खटाव) येथील दीपक आप्पासाहेब देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. आणि याची सुनावणी करताना न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. एस. सी. चांडक यांच्या खंडपीठाने  सातारच्या पोलीस अधीक्षकांना मुंबई उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश जारी केले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.