पोलिसच असुरक्षित? गाडी अडवल्याच्या रागातून पोलिसाला बेदम मारहाण, दोघांना अटक
पुणे : खरा पंचनामा
पुणे शहर सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे तेच पोलीस देखील असुरक्षित असल्याचे मागिल काही दिवसांपसून घडत असलेल्या घटनांवरुन दिसून येत आहे. पुण्यातील मध्यवस्तीत ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई दरम्यान वाहतूक शाखेच्या महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. तर बोपोडी मध्ये मद्यपान करुन भरधाव वेगात कार चालवणाऱ्या व्यक्तीने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना उडवले. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. यातच आता सिंहगड रोड रस्त्यावर वाहतुक नियमन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला गाडी अडवल्याच्या कारणावरुन बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी मंगेश शिवाजी फडके आणि बापू रोहिदास दळवी यांच्या विरोधात हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पुण्यातील सिंहगड रस्त्यावर कोल्हेवाडी फाटा येथे चेक पॉईटवर वाहतुकीचे नियोजन करत असणाऱ्या पोलीस अंमलदार ऋषिकेश गायकवाड यांनी दोघांना त्यांच्या गाड्या बाजूला घेण्यास सांगितले. यावरून संतापलेल्या मंगेश फडके आणि रोहिदास दळवी यांनी त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. मी कोण आहे? तुला माहीत नाही? तू नोकरी कशी करतो तेच बघतो, असं म्हणत दोघांनी पोलीस अंमलदार ऋषिकेश गायकवाड धमकावत मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी गायकवाड यांच्या मदतीसाठी गेलेले दुसरे पोलीस कर्मचारी यांना देखील आरोपींनी मारहाण केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.