सिट बेल्ट लावला, सिग्नलही नाही तोडला तरीही कापला चलान!
बंगळूरु : खरा पंचनामा
कर्नाटकातील एका कार चालकाने वाहतूके सर्व नियम पाळते, त्याने सिटबेल्ट लावला होता शिवाय त्याने कोणताही सिग्नल तोडला नाही. तरी देखील त्याला पोलिसांनी थांबवले आणि त्याला 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.
ज्यांनी ही चूक पहिल्यांदा केली त्यांना 500 रुपयांचे चलन बजावण्यात आले, तर पुन्हा पुन्हा करणाऱ्यांना 1000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
या कार चालकांची एकच चूक होती की ते आपली कार हाय-बीमवर चालवत होते. रात्रीच्या वेळी हाय-बीम हेडलाइट्स लावल्या जात असल्याच्या अनेक तक्रारींनंतर, बेंगळुरू वाहतूक पोलिसांनी इतर प्रवाशांची गैरसोय करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. कर्नाटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हाय-बीम लाईटचे नियम मोडणाऱ्या 1,518 लोकांवर कारवाई करण्यात आली.
कर्नाटकचे अतिरिक्त महासंचालक वाहतूक आणि रस्ता सुरक्षा आलोक कुमार यांनी ट्विटरवर लिहिले, 'केंद्रीय मोटार वाहन नियमांतर्गत चमकदार किंवा फ्लॅशिंग एलईडी हेडलाइट्स वापरण्यावर निर्बंध आहेत. याचे उल्लंघन करणाऱ्या 1,518 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.