"पापा को बोलो, वॉर रुकवा दो...."
नवी दिल्ली : खरा पंचनामा
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषद घेत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. खासदार मला घरी भेटायला येत असतात, पण मला देखील त्यांना भेटायचं होतं. त्यामुळे दिल्लीत आलो आहे. महाराष्ट्रात निवडणुका आहेत त्यामुळे या भेटी घेत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी बांगलादेशमधील हिंदूंवरील हल्ल्यावर देखील भाष्य केलं आहे. इतर देशात काय घडतंय हे पाहावं लागेल. इस्राईल, श्रीलंका, बांगलादेश मध्ये काय होतंय. सरकारने त्याकडे पाहावं. जनतेचे न्यायालय सर्वात मोठे असते. जनतेच्या न्यायाचा निर्णय बांगलादेशमध्ये झाला आहे. लोकांची भावना समजून घेतली पाहिजे, असं ते म्हणाले.
लोकांचा संयम सुटत चालला आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होत असतील तर पंतप्रधान मोदी यांनी पाऊलं उचलावीत. बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणाची जबाबदारी मोदी सरकारी आहे. याच भारताने बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं. त्यामुळे आता मोदींनी मणिपूरला जात नसले तरी त्यांनी बांगलादेशमध्ये जावं किंवा तेथे होणाऱ्या हिंदूवरील हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न करावेत.
जनता सर्वोच्च असते, त्यांना निर्णय अंतिम आणि गंभीर असतो. देशात अशीच परिस्थिती होईल असं म्हणत नाही. पण, जगभरात ज्या घडामोडी घडत आहेत त्याकडे गंभीरतेने पाहायला हवं. अशी स्थिती निर्माण होईल असं काही सरकारने करायला नको, असं ठाकरे म्हणाले.
पापा ने वॉर रुकवा दी म्हणतात. मग आता त्यांच्या नेत्यांना सांगा पापांना वॉर थांबवायला. पापा को बोलो, वॉर रुकवा दो...., असं म्हणत ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी बांगलादेशमध्ये जावं आणि सध्या सुरु असलेली परिस्थिती नियंत्रणात आणावी असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.