Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'सीबीआय'च्या रडारवर असणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने जीवन संपवले

'सीबीआय'च्या रडारवर असणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने जीवन संपवले



दिल्ली : खरा पंचनामा

५० लाख रुपयांच्या लाचप्रकरणी सीबीआयने दोनवेळा चौकशी केलेले 'ईडी'चे अधिकारी आलोक कुमार रंजन यांनी आपलं जीवन संपवलं. मंगळवारी (दि.२०) त्यांचा मृतदेह दिल्लीजवळील साहिबाबादमध्ये रेल्वे रुळावर आढळून आला.

ईडीचे सहाय्यक संचालक संदीप सिंग यांनी आर्थिक व्यवहार प्रकरणी एका ज्वेलर्सला अटक न करण्यासाठी ५० लाख रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी सीबीआयने संदीप सिंग यांना दिल्लीत 20 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले होते. संदीप सिंग यांना निलंबितही करण्यात आले आहे. या प्रकरणात आलोक कुमार रंजन यांचे नाव समोर आले. नुकतीच कथित भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने त्यांची दोनदा चौकशी केली होती; परंतु पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

गाझियाबादचे रहिवासी असलेले आलोक कुमार नवी दिल्लीत ईडीमध्ये प्रतिनियुक्तीवर होते. तत्पूर्वीते आयकर विभागात कार्यरत होते. अलोक कुमार रंजन यांनी जीवन का संपवलं याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.