राज्य पोलीस दलातील पाच आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई : खरा पंचनामा
राज्य पोलीस दलातील पाच आयपीएस अधिकाऱ्यांच्या गुरुवारी (ता. 22 ऑगस्ट) गृहविभागाने बदलीचे आदेश जारी केले. त्यामध्ये निसार तांबोळी यांची नागपूरच्या सहपोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. गृह विभागातर्फे आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीची यादी गुरुवारी जारी करण्यात आली.
गुरुवारी संध्याकाळी गृहविभागाचे सहसचिव व्यकंटेश भट यांनी पाच आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले होते. या अधिकाऱ्यांना त्यांच्या नवीन नियुक्त केलेल्या ठिकाणी तातडीने रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. ज्या पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले होते, त्यात राज्याचे राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहपोलीस आयुक्त निसार तांबोळी यांची नागपूर शहर सहपोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
तसेच, बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या शारदा राऊत यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सागरी सुरक्षा आणि विशेष सुरक्षा विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक, तर भंडारा जिल्ह्यांचे पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांची राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाच्या सहाय्यक पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तसेच, वर्धा जिल्ह्यांचे पोलीस अधिक्षक नुरुल हसन यांची भंडाऱ्याच्या पोलीस अधिक्षक, नंदूरबारचे अप्पर पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांची नागपूरच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधिक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.