कराडमध्ये आणखी एका प्रियकराने प्रेयसीला संपवलं !
कराड : खरा पंचनामा
उरणमधील यशश्री शिंदेचं प्रकरण ताजं असताना कराडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कराडमधील एका मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आरूषी सिंह नावाच्या तरुणीला इमारतीवरून ढकलून देत हत्या केल्याची घटना घडली आहे.
या घटनेनंतर कराडमध्ये खळबळ उडाली आहे. आरूषी ही मूळची हरियाणाची असून प्रियकर ध्रुव छिक्कारसोबत कराडमधील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला शिकत होती. दोघेही दिल्लीमध्ये एकत्र शिक्षण घेत होते. तेव्हापासून दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं.
त्यानंतर दोघांनी एकत्रच कराडमधील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ध्रुव कृष्णा मेडिकल कॉलेजजवळ असलेल्या सनसिटी बिल्डींगमध्ये राहत होता. 31 जुलै रोजी ध्रुवने आरुषीला आपल्या फ्लॅटवर बोलावून घेतलं होतं. तो आरूषीवर संशय घेत होता. तुझं दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबध आहेत असं म्हणत ध्रुव आणि आरुषी यांच्यात जोरात वादावादी झाली. त्यानंतर प्रियकर ध्रुवने आरुषीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकलून दिले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. यावेळी झालेल्या झटापटीत ध्रुवही जखमी झाला आहे. त्याचा पाय मोडला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री उशीरा आरुषीची आई कराडमध्ये दाखल झाल्या. यानंतर मध्यरात्री 103 (1) प्रमाणे ध्रुववर गुन्हा दाखल करण्यात आली. आरोपी ध्रुव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्यामुळे त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
या घटनेत आरुषी सिंग हिचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून या प्रकरणात तपास सुरू आहे. दोघांचं शाळेपासून प्रेम होतं, मात्र एका वादातून आरूषीला जीव गमवावा लागला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.