खेळताना गळफास लागल्याने बालिकेचा मृत्यू
सांगली : खरा पंचनामा
शहरातील इंदिरानगर येथे बालिकेचा घरात खेळत असतानाच कापडी बेल्टने फास बसून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. बालिकेचा मृत्यू की घातपात या संशयावरुन पोलिसांनी दीड तास चौकशी केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही शासकीय रुग्णालयात भेट दिली. वैद्यकीय तपासणीत गळफास बसून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुढील कार्यवाही सुरु झाली.
सिव्हील हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस सावंत प्लॉटमध्ये मुलीचे कुटुंब राहते. तिचे वडील हे मार्केट यार्डात हमाली करतात. त्यांना मोठी मुलगी आणि दोन वर्षाचा मुलगा आहे. वडील गावाकडे गेले होते. दुपारी चारच्या सुमारास मुलीला खुंटीला कापडी बेल्टने फास लागल्याचे मुलीच्या आईला दिसून आले. त्यामुळे तिला धक्का बसला. तिने आरडाओरड करून शेजारील लोकांना बोलवले. मुलीला खुंटीवरून खाली काढले. त्यानंतर तिला तातडीने सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतू ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.