राज्य उत्पादन शुल्कच्या ७ उपअधीक्षकांच्या बदल्या
मुंबई : खरा पंचनामा
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पाश्वर्भूमीवर निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार राज्य उत्पादन शुल्कच्या ७ उपअधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाचे उप सचिव रविंद्र औटे यांच्या सहीने शनिवारी बदल्यांचे हे आदेश काढण्यात आले आहेत. कृष्णा कारखान्याचे उपअधीक्षक एस. आर. घायतडक यांची साताऱ्याच्या उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
मुंबई शहर २ चे सुधीर पोकळे यांची नवी मुंबई ३ च्या उपअधीक्षकपदी, युनायटेड स्पिरिटसकडील अनिरूद्ध पाटील यांची पुणे विभागीय उपायुक्त कायार्लयाकडे बदली करण्यात आली आहे. सांगलीतील राजारामबापू कारखान्याकडील गणेश कसरे यांची पुणे (शिरूर)च्या उपअधीक्षकपदी, पालघरचे सी. पी. हांडे यांची मुंबई शहरच्या उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. नाशिकचे आर. व्ही. उगले यांची राज्य भरारी पथकाचे उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. प्रवरानगर येथील ए. डी. देशमुख यांची कल्याणच्या उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.