'सरकारविरोधात बोलताच सदानंद सुळेंना इन्कम टॅक्सची नोटीस'
सोलापूर : खरा पंचनामा
भाजप सरकारच्या विरोधात जेव्हा मी बोलते, तेव्हा माझ्या पतीला (उद्योजक सदानंद सुळे) नोटीस येते. प्राप्तीकर विभागाची (इन्कम टॅक्स) सदानंद सुळे यांना सोमवारीच (ता. 12 ऑगस्ट) नोटीस आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रा सोलापूर आहे. यात्रेसाठी सोलापूरमध्ये आलेल्या सुप्रिया सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी सदानंद सुळे यांना आलेल्या नोटिशीचा उल्लेख केला.
आम्ही विरोधात बोललो म्हणून सीबीआय, ईडी आदी केंद्रीय एजन्सीच्या चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लावला जातो, असलं गलिच्छ राजकारण आम्ही कधी केलं नाही. मी जेव्हा जेव्हा सरकारच्या विरोधात बोलते, तेव्हा इनकम टॅक्स विभागाची सदानंद सुळे यांना नोटीस येतेच. मी किती वेळा पार्लमेन्टमध्ये बोलते, त्या दरम्यान त्यांना नोटीस येते, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, या सरकार कडून माझ्या काहीच अपेक्षा नाहीत. फेक नॅरेटीव्हचा भाग ते म्हणतात. आता जे पोटात होत, ते ओठात आलं. नाती हा चॅनेलवर बोलायचं विषय नाही. माझं आयुष्य वास्तव आहे. टीव्हीवर दाखवून माला त्याचा तमाशा करायचा नाही. माझी नाती ही फक्त रक्ताची नसतात, तर ती प्रेमाची आणि विश्वासाचीही असतात. अदृश्य शक्तीने आमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं ठरवलं होत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.