"लोकसभेला जोरदार झटका दिलात, कंबर मोडली, आमची चूक झाली"
नाशिक : खरा पंचनामा
लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या आक्रोशाचा मोठा फटका भाजपला बसला आहे. विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकार विरोधात मतदान केल्यानं अनेक उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सरकारच्या या निर्णयाचा महायुतीला मोठा फटका बसला याची जाहीर कबुली खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. कांदा निर्यात आता बंद करायची नाही. लोकसभेला मोठा झटका दिला आमची कंबर मोडली, चूक झाली, माफ करा असे अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. आमदार दिलीप बनकरांच्या निफाड मतदारसंघात अजित पवार दौऱ्यावर आहेत. त्यावेळी शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांनी पुढचे बीज बिल भरायचे नाही, मागचे थकलेलं बिल द्यायचे नाही. केंद्र सरकार आमच्या विचारांचे आहे. कांदा निर्यात आता बंद करायचे नाही. लोकसभेमध्ये जो झटका दिला तो जोरात लागला. कंबर मोडली, आमची चूक झाली माफ करा... जो काम करतो तोच चुकतो कांदा निर्यात बंदी करायची नाही, वीज बिल माफ करा हे निर्णय दिले. दूध, कापूस, सोयाबीन, भात यासाठी योजना आणल्या आहेत.
आम्ही अडीच वर्षे सत्तेत होतो, त्यानंतर सरकार पडले, कसे पडले सर्वाना माहिती आहे. आम्ही किती दिवस सांगायचे सत्तेत नाही, सत्तेत आलो म्हणून विकास कामासाठी निधी देता आला. मी कोणाला दुखवण्यासाठी निर्णय घेतला नाही. कामासाठी आलोय. आम्ही अभ्यास करणारी माणसे आहोत, हवेत गप्पा मारणारी नाही. तुमचा विश्वास पाहिजे. काम कसे करून घेतले पाहिजे हे महत्त्वाचे आहे. काल रात्री बैठक घेतली. सव्वा ते दीड कोटी प्रयत्न महिला पात्र ठरल्या आहेत अजूनही लाही नोंदणीचे काम सुरू आहेत, अडचणी येत अहेय. आम्ही त्यातून मार्ग काढत आहे. 17 तारखेल 6 हजार कोटींच्या फाईल वर सही केल्या आणि काल नाशिकला आलो, असे देखील अजित पवार म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.