सुप्रिया सुळेंचा मोबाईल आणि व्हॉटस्अॅप हॅक
पुणे : खरा पंचनामा
तंत्रज्ञानाचे जेवढे फायदे आहेत, तेवढेच तोटे देखील आहेत. तंत्रज्ञानामुळे आपली कामं सोपी झाली. क्षणारार्धात कोणाशीही कधीही मोबईद्वारे आपल्याला सहज संपर्क साधता येतो. मात्र आता याचा तोटा म्हणजे मोबाईल हॅकिंगचा धोका देखील वाढला आहे. अनेकांना हॅकिंगचा फटका बसतो.
मोबाईल हॅक केले जातात. कित्येकदा आपल्या मोबाईलमध्ये असलेली महत्त्वाची माहिती आपला मोबाईल हॅक करून हॅकर काढू देखील शकतात. मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे या हॅकिंगचा फटका आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना देखील बसला आहे.
सुप्रिया सुळेंचा मोबाईल आणि व्हॉटस्अॅप हॅक करण्यात आलं आहे. त्यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. 'अत्यंत महत्वाचे माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी.' असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.