राज्य उत्पादन शुल्ककडील ३५९ उपनिरीक्षकांच्या बदल्या
सांगलीत १३, साताऱ्यात ०८, कोल्हापूर जिल्ह्यात ११ अधिकारी नव्याने येणार
मुंबई : खरा पंचनामा
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागातील ३५९ उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. उत्पादन शुल्कचे आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांच्या सहीने शनिवारी बदल्यांचे हे आदेश काढण्यात आले आहेत. विभागाच्या पुनर्रचनेमुळे दुय्यम निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहेत.
या बदल्यामध्ये सांगली जिल्ह्यातील ०९ अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे तर १३ अधिकारी नव्याने सांगली जिल्ह्यात येणार आहेत. सातारा जिल्ह्यात ०८ अधिकारी नव्याने दाखल होणार असून ६ अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ११ अधिकारी नव्याने येणार असून तब्बल १९ अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली आहे.
सुभाष मांजरे, सतीश कोळी, वर्षा पाटील, बबन पाटील, निशिगंधा पाटील, रेश्मा ऱ्हाटोळ, भिमराव बच्चे, महेश पाटील, जयसिंग खुटावळे, पांडुरंग भोसले, संदेश तडवळेकर, पूजा मुदगल, लक्ष्मण पोवार आदी अधिकारी नव्याने येणार आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.