भाजप नेत्याची 45 वर्षांची बायको पोलिसासोबत गेली पळून, सोबत 2 कोटी रुपयेही नेले!
भदोही : खरा पंचनामा
उत्तर प्रदेशातल्या भदोहीमध्ये राजकीय पार्श्वभूमी असलेल्या एका घरात विचित्र प्रकरण घडलं आहे. भाजपकडून अध्यक्षपदाची निवडणूक लढवलेली 45 वर्षांची महिला प्रियकरासोबत घरातून पळून गेली आहे. विशेष म्हणजे तो पोलीस कर्मचारी असून, महिलेपेक्षा 15 वर्षांनी लहान आहे.
उत्तर प्रदेशातल्या भदोहीमध्ये एका भाजप नेत्याच्या घरी जे घडलं, त्याची परिसरात खूप चर्चा होत आहे. भदोहीतल्या गोपीगंज नगरमध्ये ही घटना घडली आहे. तिथे राहणाऱ्या एका भाजप नेत्यानं पत्नी घरातून पळून गेल्याची तक्रार पोलिसांकडे दिली आहे. साधारण एक वर्षभरापूर्वी गोंडा इथे राहणारा शिपाई विनय तिवारी उर्फ राज तिवारी त्यांच्या घरी भाड्यानं राहण्यास आला. त्यानंतर तो पोलीस शिपाई व नेत्याच्या पत्नीचं अफेअर सुरू झालं. नेत्याला त्याची काहीही खबरबात समजली नाही. त्या शिपायानं चलाखीनं नेत्याच्या पत्नीला स्वतःच्या जाळ्यात ओढलं. मग त्याने पत्नीचे आक्षेपार्ह फोटो काढले व त्या जोरावर तो त्यांना धमकावू लागला. कोणाला सांगितलं, तर तुम्हाला सगळ्यांना अडकवू असंही म्हणाला.
घडलेल्या प्रकाराची माहिती मिळताच भाजप नेत्यानं त्या पोलीस शिपायाला घरातून काढून टाकलं. स्वतःच्या पत्नीलाही खूप समजावलं; मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्या पोलीस शिपायाला घरातून काढल्यानंतर त्यानं कटकारस्थानं करण्याचा प्रयत्न केला. त्यानं 28 ऑगस्ट रोजी नेत्याच्या महिलेला फूस लावून घरातून पळवून नेलं. त्या वेळी घरात कोणीही नव्हतं. त्याचाच फायदा घेऊन पत्नीनं घरातले दोन कोटींपेक्षा अधिक रुपयांचे दागिने व चार लाखांची रोख रक्कम घेतली.
ही महिला 45 वर्षांची असून तिनं घरातून जाताना त्यांच्या सात वर्षांच्या मुलालाही सोबत नेलं आहे. त्यांना शोधण्याचा प्रयत्न करूनही ते सापडले नाहीत, असं भाजप नेत्यानं म्हटलंय. या प्रकरणात काही स्थानिकांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. पोलीस शिपाई घरात राहत असतानाही अनेक गैरप्रकार करताना तो आढळला होता. त्या वेळी पोलिसांना सूचना देऊन त्यांच्याच मदतीनं त्याला घराबाहेर काढलं होतं.
पोलिस शिपायानं आपल्या पत्नीला फसवून तिला पळवून नेल्याचा आरोप भाजप नेत्यानं केलाय. केवळ पैशांसाठी त्यानं हे कृत्य केल्याचं त्यांनी म्हटलंय. भाजप नेत्यानं दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांचा शोध सुरू केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.