मंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याच्या बंगल्यासमोर गोळीबाराचा थरार
धाराशिव : खरा पंचनामा
धाराशिवमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या परंडा तालुक्यातील सोनारी येथील घरासमोर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
काल मध्यरात्री 12 वाजून 37 मिनिटांनी दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवर येऊन गोळीबार केल्याचा दावा धनंजय सावंत यांच्या सुरक्षारक्षकाकडून करण्यात आला आहे. या घटनेने धाराशिव जिल्ह्यासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार झाला असून या घटनेने खळबळ उडाली आहे. धाराशिव जिल्ह परंडा तालुक्यातील सोनारीमधील बंगल्यासमोर हा गोळीबाराचा थरार घडला असून या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.