Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लष्कराच्या निवृत्त अधिकाऱ्याचा निर्घ्रुण खून डोरली फाटा येथील घटना; कारण अस्पष्ट, संशयिताचा शोध सुरू

लष्कराच्या निवृत्त अधिकाऱ्याचा निर्घ्रुण खून
डोरली फाटा येथील घटना; कारण अस्पष्ट, संशयिताचा शोध सुरू



सांगली : खरा पंचनामा

तासगाव तालुक्यातील डोरली फाटा येथे राहणाऱ्या लष्करातील निवृत्त अधिकाऱ्याचा लोखंडी सळईने मारहाण करून खून करण्यात आला. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दरम्यान हा खून कोणत्या कारणावरून झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. संशयितांच्या शोधासाठी एलसीबीची पथके विविध ठिकाणी पाठवण्यात आली आहेत. 

गणपती धोंडीराम शिंदे (वय ६५) असे मृताचे नाव आहे. शिंदे डोरली फाटा परिसरात एकटेच रहात होते. त्यांना दोन मुले असून दोघेही नोकरीनिमित्त कुटुंबासह परगावी राहतात. गुरुवारी सकाळी रक्ताने माखलेला त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर खुनाची घटना उघडकीस आली. याची माहिती मिळाल्यानंतर तासगाव पोलिसांसह एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. 

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात आला आहे. दरम्यान शिंदे यांच्या परिचयातील व्यक्तीने हा खून केल्याचा संशय पोलिसांना आहे. कोणत्यातरी तात्कालीक कारणावरून हा खून झाल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी पोलिसांना काही जणांवर संशय असून त्यांच्या शोधासाठी एलसीबीची पथके विविध ठिकाणी पाठवण्यात आली आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.