कर्मवीर पतसंस्थेचे सामान्य माणसाला उभे करण्याचे कार्य कौतुकास्पद
पद्मविभूषण डॉ अनिल काकोडकर यांचे प्रतिपादन
सांगली : खरा पंचनामा
समाजातील चांगल्या मंडळींची पुरस्कारासाठी निवड करुन त्यांचे काम सर्वांच्या पुढे आणण्याच काम कौतुकास्पद कार्य कर्मवीर पतसंस्था करीत आहे, असे प्रतिपादन जेष्ठ अणूशास्त्रज्ञ आणि 'भारतीय अणुउर्जा महामंडळाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.
कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था व कर्मवीर चॅरीटेबल ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित कर्मवीर भूषण वितरण सोहळा त्यांच्याहस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भारती विद्यापीठाचे कुलपति प्रा. डॉ. शिवाजीराव कदम प्रमुख उपस्थित होते. काकोडकर म्हणाले, कर्मवीर आण्णांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजासाठी केलेल्या कामाला जगाच्या इतिहासात जोड नाही. ते विचार घेऊन कर्मवीर पतसंस्था समाजातील सामान्य माणसाला आर्थिक उभारी देण्यासाठी चांगले कार्य करीत आहे. भारत हा तरुणांचा देश आहे. त्या तरुण पिढीला देशाच्या विकासामध्ये वाव मिळाला पाहिजे. या तरुणामध्ये फार मोठी प्रतिभा आहे. अनेक देशात ते भारताचे नाव उज्ज्वल करीत आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक माणसाचं लहान मोठ योगदान आहे. पण देशातील प्रत्येक माणसाच जीवनमान उंचावल पाहिजे. त्यासाठी देशाला मोठा पल्ला गाठला पाहिजे. तो गाठता येईल याची मला खात्री आहे. पण देशातील विषमता नष्ट केली पाहिजे.
देशात सुबत्ता निर्माण करण्यासाठी आपण टेक्नोलॉजीचा स्वीकार करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. टेक्नोलॉजीची कॉपी न करता टेक्नोलॉजी विकसीत केली पाहिजे. यातून आपण एक प्रबळ देश म्हणून जगाच्या नकाशावर पुढे येऊ असा विचार डॉ. काकोडकर यांनी व्यक्त केले.
शेतात घरी बसुन आपला तरुण उत्पादन करुन शकेल व व्यवसाय मिळवू शकेल. वर्क फ्रॉम होत असेल तर वर्क फ्रॉम व्हीलेज सुद्धा होवू शकते. आपल्या तरुणांनी शहराकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. आपल्याकडे खुप संशाधने असल्यामुळे शहरातील माणसे खेड्याकडे येतील त्यातून अर्थव्यवस्थेला गती मिळेल. यामध्ये कर्मवीर पतसंस्था मोठे योगदान देवू शकते असा विश्वास त्यांनी या पुरस्कार वितरण सोहळयात व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस दिपप्रज्वलन व कर्मवीर आण्णांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले. त्यांनी संस्थेच्या सामाजिक व आर्थिक कार्याची माहिती दिली. मान्यवरांचे संस्थेच्या पदाधिकारी यांच्यावतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्मवीर कृषीभूषण, प्रा. डॉ. डी. डी. चौगुले यांना कर्मवीर विद्याभूषण व उद्योजक श्री. योगेश लक्ष्मण राजहंस यांना कर्मवीर उद्योगभूषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. पुरस्कार रुपाने ५१ हजारांचा धनादेश, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित डॉ. अजित पाटणकर व पुर्व पुरस्कार प्राप्त मनोहर सारडा यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कर्मवीर चॅरीटेबल ट्रस्ट च्या वतीने मुकबधीर मुलांच्या शाळेस १ लाखाच्या मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.
पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांनी संस्थेला धन्यवाद दिले व या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. तसेच या परिसरातील अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांनी ही कार्यक्रमास उपस्थिती लावली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उपकरणांच्या स्टॉलला डॉ. काकोडकरांनी भेट देवून त्यांचे कौतुक केले.
यावेळी कर्मवीर चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ओ. के. चौगुले (नाना), कार्यवाह लालासाहेब भाऊसाहेब थोटे, संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे, संचालक डॉ. रमेश वसंतराव ढबू, वसंतराव धुळाप्पाण्णा नवले, डॉ. एस.बी. पाटील (मोटके) डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील, संचालिका भारती आप्पासाहेब चोपडे, चंदन नरेंद्र केटकाळे, संचालक आप्पासाहेब गवळी, बजरंग माळी, अमोल रोकडे, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदुम उपस्थित होते. आभार संचालक अॅड. एस. पी. मगदूम यांनी मानले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.