एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांना सन्मानपत्र प्रदान
मिरजेतील श्री गांधी चौक गणेशोत्सव मंडळातर्फे पालकमंत्र्यांच्याहस्ते गौरव
सांगली : खरा पंचनामा
मिरजेतील महात्मा गांधी चौक गणेश मंडळातर्फे पोलिस दलातील उल्लेखनीय सेवेबद्दल एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांचा कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी ना. खाडे, निरीक्षक शिंदे यांच्याहस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आला. यंदा या मंडळाचे 70 वे वर्ष आहे.
यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम, मोहन व्हनखंडे, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे, एक्साईजचे मिरजेचे निरीक्षक श्री. सुपे, माजी नगरसेवक सुरेश आवटी, संदीप आवटी, माजी नगरसेवक गणेश माळी, डॉ. रियाज मुजावर, डॉ. प्रताप भोसले, डॉ. विकास पाटील, एलसीबीचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन सावंत, उद्योजक अतुल खोत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रभात हेटकाळे, धनंजय गडदावर, अशोक कदम, विनायक शेडबाळे, विजय अस्वले, विनोद सावंत, गजेंद्र कीर, अभिषेक भोसले, इम्तियाज पठाण, पप्पू सावंत, प्रभाकर अस्वले, प्रेम चिंतनवार आदींनी संयोजन केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.