Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

संकटमोचक गिरीश महाजनांविरोधात भाजपच्या मात्तबर नेत्याला तिकीट?

संकटमोचक गिरीश महाजनांविरोधात भाजपच्या मात्तबर नेत्याला तिकीट?



जळगाव : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपला एकामागे एक धक्के देत आहेत. आता शरद पवारांनी आपला मोर्चा जळगावकडे वळवला असून भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन यांच्या विरोधात शरद पवार एका मात्तबर नेत्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची माहिती मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा 21 तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. या यात्रेला शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत. या यात्रेदरम्यान भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दिलीप खोडपे हे गिरीश महाजन यांच्या विरोधात जामनेर विधानसभा लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. दिलीप खोडपे यांची जळगाव जिल्ह्यात मराठा नेता म्हणून ओळख आहे. एकट्या जामनेर मतदारसंघात मराठा समाजाची तब्बल 1 लाख 40 हजार मतदान आहे. त्यामुळे दिलीप खोडपे हे गिरीश महाजन यांच्या समोर तगडे आव्हान देण्याची शक्यता आहे.

मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात आगामी विधानसभा निवडणुकीत आपण राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उभे राहण्याची तयारी करत असल्याचं दिलीप खोडपे यांनी सांगितलं आहे आहे. गेल्या 35 वर्षापासून आपण भाजपचे काम करत आहे. गेल्या दहा वर्षापासून भाजपमध्ये आपली घुसमट होत आहे. त्यामुळे आपण भाजपचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत, असे माहिती दिलीप खोडपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

तर, राष्ट्रवादी शरद पवार गटात सहभागी होऊन जामनेर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत आपली याबाबत प्राथमिक बोलणी झाल्याने आपण तयारी सुरू केल्याचंही खोडपे यांनी म्हटले आहे. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांना त्यांच्याच जामनेर मतदारसंघात आव्हान निर्माण झाले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.