"मुख्यमंत्री शिंदेंचं शिक्षण किती? त्यांनी जेवढे अधिकार तेवढंच.."
भाजपच्या बड्या नेत्याची गंभीर टीका
नंदुरबार : खरा पंचनामा
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. मात्र त्यापूर्वी राज्यात आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील तर ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके आक्रमक भूमिका घेत आहेत. त्याचबरोबर धनगर आरक्षणाचा मुद्दा देखील चर्चेमध्ये आला आहे. यावरुन आता सत्ताधारी महायुतीमध्ये मतभेद आणि संघर्ष व्हायला सुरुवात झाली आहे. आरक्षणाच्या मुद्दायवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजप नेत्यानेच टीका केली आहे. मुख्यमंत्री शिंदेंचे शिक्षण काढत मुख्यमंत्री शिंदेंना घरचा आहेर दिला आहे.
आरक्षणाचा मुद्दा चर्चेमध्ये असताना मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. तेच आरक्षण देतील अशी जरांगे पाटील यांची भूमिका आहे. मात्र त्यांनी भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अविश्वास दाखवत जोरदार टीका केली आहे. आता भाजप नेत्याने धनगर आरक्षणावरुन मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याचा शब्द मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे. यावर भाजप नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी हे आक्रमक झाले आहेत.
पद्माकर वळवी म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकार जितके आहेत तेवढेच त्यांनी वापरावेत. शिंदे समिती ही घटनाबाह्य तयार केलेली समिती आहे. शिंदे समितीला घटनात्मक कुठलाही अधिकार नाही. धनगर समाजाला शॉर्टकट आरक्षण देण्याच्या प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेला निकालानंतर देखील मुख्यमंत्री धनगर समाजाला जीआर कसा देऊ शकतात? जीआर देणे ही अतिशय गंभीर बाब आहे. येणाऱ्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन दिले जात आहे. आदिवासी आमदार, खासदारांनी राजीनामा देण्याची गरज नाही. सरकारमध्ये राहून सरकारसोबत भांडण केले पाहिजे," असा बंडखोर पवित्रा भाजप नेते पद्माकर वळवी यांनी घेतला आहे.
भाजप नेते पद्माकर वळवी यांनी लोकसभा निवडणूकीच्या पूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी पद्माकर वळवी यांची शिंदेंवर टीका करताना जीभ घसरली होती. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख केला करत शिंदे हे बेरड, मूर्ख आणि नालायक मुख्यमंत्री असल्याचे पद्माकर वळवी यांनी म्हटले होते. भाजपमधील पद्माकर वळवी यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. त्यामुळे शिंदे गटातील नेते आक्रमक झाले असून भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांना समज द्यावी अशी मागणी केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.