Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सराफांची फसवणूक करणाऱ्या मुख्य सूत्रधारासह महिलेला अटक ओरिसा येथे सांगली एलसीबीच्या पथकाची कारवाई

सराफांची फसवणूक करणाऱ्या मुख्य सूत्रधारासह महिलेला अटक
ओरिसा येथे सांगली एलसीबीच्या पथकाची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

आटपाडी येथील सराफांनी दागिने बनवण्यासाठी दिलेले चोख सोने घेऊन पोबारा करणाऱ्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारासह त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली. ओरिसा येथील जगन्नाथपुरी येथे पथकाने ही कारवाई केल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली. 

गौतम गोपाल दास (वय ४३), रूमा गौतम दास (वय ३७, दोघेही रा. दक्षिण पाडा, कोलाघाट, पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आटपाडी येथील सराफी व्यावसायिक प्रसाद जवळे यांनी संशयित गौतम दास याला दागिने बनवण्यासाठी चोख सोने दिले होते. ते घेऊन तो पसार झाला होता. याप्रकरणी सांगली शहर आणि आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे एक पथक तयार केले होते. पथक त्यांना शोधण्यासाठी पश्चिम बंगाल येथे गेले होते. 

गौतम दास सातत्याने ठिकाण बदलत होता. त्यामुळे पथकाने तेथील खबऱ्याद्वारे तसेच तांत्रिक माहितीनुसार त्याची माहिती काढून ओरिसा येथील जगन्नाथपुरी येथून ताब्यात घेण्यात आले. तर सांगली शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्याची पत्नी रूमा हिलाही अटक करण्यात आली. दोघांनाही सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, रूपाली बोबडे, अमोल लोहार, उदयसिंह साळुंखे, संदीप नलावडे, सुनील जाधव, सोमनाथ पतंगे, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.