वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
मुंबई : खरा पंचनामा
वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाकडून ११ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी दोन महिन्यांचा कालावधी राहिला आहे. त्यामुळे उमेदवारांची नावे जाहीर करून आंबेडकरांनी आघाडी घेतली असं म्हणावं लागेल.
पक्षाकडून रावेर, सिंधखेड राजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, नागपूर साऊथ वेस्ट, साकोली, नांदेड साऊथ, लोहा, औरंगाबाद इस्ट, शेवगाव, खानापूर या मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. पक्षाचे अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफोर्म 'एक्स'वर ही यादी पाहायला मिळेल.
विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना पाहायला मिळणार आहे. पण, याच बरोबर राज्यात तिसऱ्या आघाडीची देखील चाहूल मिळत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांचा एकही उमेदवार निवडून आलेला नव्हता. त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती.
लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला धक्का बसला आहे. त्यामुळे महायुतीकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आला आहे. यावेळी महायुतीकडून विकास कामांच्या प्रचारावर लक्ष्य देण्यात आले आहे. दुसरीकडे, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांवर निशाणा साधला आहे. प्रकाश आंबेडकर यांना राज्यातील जनता किती साथ देणे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राज्यात तिसऱ्या आघाडीने देखील मुसंडी मारली आहे. प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि स्वराज संघटनेचे प्रमुख संभाजीराजे यांनी एकत्र मोट बांधली आहे. तिसऱ्या आघाडीमुळे राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अधिक रस निर्माण झाला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.