एकाच महिलेला किती संधी देणार?
अजित पवार गटात रुपाली पाटील ठोंबरे विरुद्ध रुपाली चाकणकर
पुणे : खरा पंचनामा
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण रंगले आहे. मात्र अजित पवार गटामध्ये अंतर्गत धुसफूस सुरु आहे. या धुसफूस महिला नेत्यांमध्ये सुरु आहे.
पुण्यातील अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यामध्ये राजकीय चढाओढ सुरु आहे. एकाच महिला नेत्याला किती जबाबदारी देणार आणि किती संधी देणार असा सवाल रुपाली पाटील ठोंबरे यांनी अजित पवार यांच्याकडे उपस्थित केला आहे. तसेच थेट आपली नाराजी देखील व्यक्त केली आहे.
अजित पवार गटामध्ये अनेक नाराज असल्याचे दिसून येत आहे. पुण्यामध्ये देखील नाराजीनाट्य दिसून येत आहे. अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे या नाराज असल्याचे समोर आले आहे. माध्यमांसमोर आणि पक्षश्रेष्ठी अजित पवार यांना पत्र लिहित आपली नाराजी व्यक्त केली आहे. रुपाली चाकणकर यांच्याकडे महिला आयोगाचे अध्यक्षपद देखील आहे. तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या देखील त्या अध्यक्षा आहे. तरी देखील आता रुपाली चाकणकर यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर आता एकाच महिलेला किती संधी देणार असा सवाल रुपाली पाटील ठोंबरे यांनी उपस्थित केला आहे.
रुपाली चाकणकर आता विधान परिषदेवर संधी मिळत असल्यामुळे पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर पोस्ट करत रुपाली पाटील ठोंबरे यांनी ही नाराजी उघड केली. रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टसाठी लिहिले आहे की, "एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार आमचे मा. अजित दादा न्याय नक्की देतील असा विश्वास आहे. एकाच महिलेला किती पदे देणार? काल पासून बातमी वाचत आहे, बातमीची शहानिशा केली तर पक्षाने कोणतेही पत्र अधिकृत दिले नाही असे सांगितले. पक्षाला कळकळीची विनंती असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये इतरही महिला आहेत त्या सक्षमतेने, दमदार कामाने मोठ्या आहेत. पक्षात कर्तुत्वान महिला खूप आहेत त्या सक्षम, काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा इतर महिलांना समान संधी द्यावी. ही विनंती असेल," असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी लिहिले आहे. सोशल मीडियावरील या पोस्टमुळे नवे राजकारण समोर आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.