ठाकरेंच्या आमदार पुत्रावर प्राणघातक हल्ला, सराईत गुन्हेगारांकडून बेदम मारहाण
अकोला : खरा पंचनामा
उद्धव ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचे सुपुत्र पृथ्वी देशमुख यांच्यावर काही सराईत गुन्हेगारांनी अकोल्यात हल्ला केलाय. अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना आहे. पृथ्वी देशमुख हा कपड्याच्या दुकानावर उभा असताना काही सराईत गुन्हेगारांनी त्याला अडवून त्याच्यावर प्राण घातक हल्ला केला. या हल्लादरम्यान सराईत गुन्हेगारांकडून पृथ्वी देशमुखला बेदम मारहाण झाली.
आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर हल्ला झाल्याची माहिती मिळतात ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. देशमुखांच्या मुलावर हल्ला करणारे सर्व जण कृषी नगर भागातील रहिवासी असल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर आलेय. पृथ्वी देशमुख याच्यावर हल्ला का केला? याबाबत बाळापूरमध्ये सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
पोराला सराईत गुन्हेगारांकडून बेदम मारहाण झाल्यानंतर तक्रार दाखल करण्यासाठी स्वतः आमदार नितीन देशमुख आणि शिवसैनिक पोलिस ठाण्यात पोचले आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.
दरम्यान, 30 मिनिट पोलिसांत कोणीही नव्हतं, सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून गुन्हे वाढतायात. पोलीस ठाण्यात हजर राहत नाहीत, आज माझ्या मुलावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याने पळ काढल्याने पुढील टळलाये. असेही आमदार नितीन देशमुख यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. पण आमदार पुत्राला मारहाण झाल्याची चर्चा बाळापूर मतदारसंघात होत आहे. पोलीस याप्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.