अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झालेल्या पोलीसांच्या गाडीमध्ये नेमकं काय सापडलं?
फॉरेन्सिक टीमकडून 'त्या' गोष्टी जप्त
मुंबई : खरा पंचनामा
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूने राज्य ढवळून निघालं आहे. सोमवारी संध्याकाळी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. सदर घटनेनंतर सदर प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरु करण्यात आली आहे.
या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास वरीष्ठ डीसीपी पराग मनेरे यांच्याकडे देण्यात आला आहे. ज्या पोलिसांच्या गाडीत अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला त्याची पाहणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. ठाणे पोलिस मुख्यालयाच्या शेजारी पोलिसांच्या परेडग्राऊडमध्ये ठेवण्यात आली आहे. यावेळी फॉरेन्सिक टीमला या पोलीस वाहनातून चार बुलेट शेल सापडले आहेत. अक्षय शिंदेने एकुण तीन गोळ्या झाडल्या, त्यापैकी एक गोळी एपीआय नीलेश मोरे यांच्या पायाला लागली, तर दोन गोळी मिस फायर झाल्या होत्या. तर एक गोळी पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी झाडली असून त्यात अक्षय शिंदे यांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी सायंकाळी सव्वासहा वाजता शिंदे याचा तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलिस त्याला ठाण्याकडे आणत असताना अचानक त्याने वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांचे रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केला. यात मोरे गंभीर जखमी झाले. अक्षय शिंदे पळून जाण्याची भीती असल्याने सीआययूचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या रिव्हॉल्वरमधून अक्षय शिंदेच्या दिशेने 3 गोळ्या झाडल्या. त्यात तो गंभीर जखमी झाला. कळवा महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.