'कुटुंबीयांना तुरुंगात घालण्याची स्वप्नं बघणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीला हद्दपार करा'
मुंबई : खरा पंचनामा
एका बाजूला संपूर्ण आयुष्य जनतेसाठी खर्ची घालणारा मी आणि दुसऱ्या बाजूला राजकीय हव्यासापोटी विरोधकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना तुरुगात घालण्याची स्वप्ने बघणारी दुष्ट प्रवृत्ती, अशी ही लढाई आहे. या सगळ्यांचा विचार आणि तुलना तुम्हीच करा आणि अशा दुष्ट प्रवृत्तीला हद्दपार करा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण विशेष साहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
मुंबईत आयोजित कागल मतदारसंघातील ग्रामस्थांच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. मुंबईकर ग्रामस्थांच्यावतीने पांडुरंग शेट्टी, अरुण पाटील, अमृत साळोखे, दत्तात्रय जाधव यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.
यावेळी शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, 'गोकुळ'चे संचालक अंबरिशसिंह घाटगे यांची भाषणे झाली. मेळाव्याला केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विठ्ठलराव भोसले, वसंतराव धुरे, सतीश पाटील, शशिकांत खोत, बाळासाहेब तुरंबे, दत्ता पाटील, कृष्णात मेटील, सूर्यकांत पाटील, सौ. शीतल फराकटे, काशिनाथ तेली, डी. एम. चौगुले, अंकुश पाटील, शिरीष देसाई, दीपक देसाई, आदी प्रमुख उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.