Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुण्यातील 'हिट एंड रन'ची सांगलीत पुनरावृत्ती दहा दुचाकींचे नुकसान; चौघे जखमी

पुण्यातील 'हिट एंड रन'ची सांगलीत पुनरावृत्ती
दहा दुचाकींचे नुकसान; चौघे जखमी



सांगली : खरा पंचनामा

पुण्यात नुकत्याच झालेल्या पोर्शे कारच्या 'हिट एंड रन'ची पुनरावृत्ति आज सांगलीतही झाली. शहरातील बापट शाळेजवळील रस्त्यावर रात्री साडेआठच्या सुमारास विरूद्ध दिशेने आणि भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीने दहा दुचाकी उडवल्या. तर चौघांना धडक देवून जखमी केले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

घटनास्थळी असलेल्या काहिनी या गाडीचा पाठलाग केला, परंतू ती गाडी भरधाव वेगाने शहर पोलिस ठाण्याच्या दिशेने निघून गेली. दरम्यान, याबाबत शहर पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.

छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई ते स्टँड रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते. शहरातील मध्यवर्ती भाग म्हणून ओळखला जातो. या रस्त्यावर एकेरी वाहतूकीस परवानगी आहे. आज रात्री साडेआठच्या सुमारास एक चारचाकी कोटणीस महाराज मार्गावरून आली. त्यानंतर ती विरूद्ध दिशेने आली. भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीने एका वृद्धाला उडवले. तर तेथील पाच दुचाकी उडवल्या. त्यानंतर बापाट बाल शाळेजवळील खाऊ गल्लीसमोर उभ्या असलेल्या अन्य दुचाकी उडवल्या. यात दुचाकी गाड्यांचे नुकसान झाले.

पांढऱ्या रंगाची चारचाकी असून त्यात दोघे तरूण होते. सुदैवाने कोणतीही जीवतहानी झाली नाही. ती चारचाकी सांगलीचीच असल्याचे घटना पाहणाऱ्या लोकांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.