चाकू, कुऱ्हाडीने सपासप वार करून तरुणाचा निर्घृण खून
एरंडोलीतील घटना, पाठीत, मानेवर गंभीर वार; कारण अस्पष्ट
मिरज ः खरा पंचनामा
मिरज तालुक्यातील एरंडोली-आरग रस्त्यावरील शाबु फॅक्टरी जवळील झुडपात तरुणाचा मानेवर पाठीत चाकू, कुऱ्हाडीने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. रात्री उशीरा पोलिसांचे पथक दाखल झाले असून पंचनामा उशीरापर्यंत सुरू होता. हल्ल्याचे कारण रात्री उशीरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.
प्रमोद वसंत जाधव (28, रा. एरंडोली) असे मृत तरूणाचे नाव आहे. मृत प्रमोद जाधव हा एरंडोलीतील जाधव वस्तीवर राहण्यास आहे. त्याचा जेसीबीचा व्यवसाय आहे. आज मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे घरातून जनावरे चरण्यासाठी बाहेर पडला होता. सायंकाळी उशीरापर्यंत घरी परतला नाही. यामुळे घरच्यांनी त्याचा शोध सुरू केला.
आज दुपारपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरात मोठ्याप्रमाणावर चिखल झाला होता. अखेर साडेआठच्या सुमारास आरग रस्त्यावरील झुडपात जाधव याचा मृतदेह दिसून आला. रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह दिसल्याने खळबळ उडाली. याबाबत तातडीने मिरज ग्रामीण पोलिसांना कळविण्यात आले. उपाधीक्षक प्रणील गिल्डा, निरीक्षक भैरू तळेकर यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी त्याच्या मानेवर वर्मी वार दिसून आले.
पंचनामा करून तातडीने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलिस करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.