मिरवणुकीतील लेझर लाईटमुळे तरुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत
कोल्हापुरातील घटना
कोल्हापूर : खरा पंचनामा
देशभरात सर्वत्र गणोशोत्सवामुळे उत्साहाचे वातावरण असताना कोल्हापुरात मात्र एक धक्कादायक घटना घडली आहे. उचगावमध्ये गणेश मंडळाच्या एका मिरवणुकीत लेझर लाईटच्या किरणांमुळे मिरवणुकीतील एका तरुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
कोल्हापूरात अनेक मंडळातील बाप्पाचा आगमन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी बाप्पाच्या मिरवणुकीत लेझर लाईट्स, मोठ मोठे डिजे लावण्यात आले होते. या लेझर लाईट्सची किरणे थेट डोळ्यावर पडल्याने तरुणाचा डोळा लाल झाला. त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागल्याने त्याच्या मित्रांनी त्याला एका रुग्णालयात दाखल केले. यावेळी लेझर लाईच्या किरणांमुळे तरुणाच्या बुबुळाला इजा होऊन अंतर्गत रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्याचा डोळा लाल झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.