समजणं थोडं कठीण, हा एन्काउंटर कसा असू शकतो?
मुंबई उच्च न्यायालयाचा पोलिसांना सवाल
मुंबई : खरा पंचनामा
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चमकीत मृत्यू झाला. या चकमकीवर प्रश्न उपस्थित करत अक्षय शिंदेच्या वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतलीय. त्यांनी तातडीने फौजदारी रीट याचिका दाखल केली असून यावर उच्च न्यायालयात सुनावमी सुरू आहे. सुनावणीवेळी अक्षय शिंदेच्या वडिलांच्या वकिलांनी गंभीर असे आरोप केले. मोठ्या व्यक्तिला वाचवण्यासाठी माझ्या मुलाचा खून केला, भविष्यात निवडणूक असल्यानं राजकीय फायदा घेतला जात असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. उच्च न्यायालयानेही एन्काउंटरवर प्रश्न विचारताना आरोपी पिस्तूल खेचून गोळीबार करतो हे समजणं थोडं कठिण वाटतंय असं म्हटलंय.
अक्षय शिंदेच्या वडिलांनी न्यायालयात म्हटलं की, मुलाने कोणताही त्रास नाहीये असं सांगितलं होते. जामिन होऊ शकतो का ? यावर त्याने जामिन होऊ शकतो असं सांगितलं. त्याने ५०० रुपये मनी ऑर्डर करायला सांगितले होते. माझ्या मुलाची पिस्तूल हिसकावण्याची हिंम्मत नाही. मोठ्या व्यक्तीला वाचवण्यासासाठी माझ्या मुलाचा निघृण खून केला गेला. भविष्यात निवडणुक असल्याने मुलावर रोष असल्याने त्याचा राजकाय फायदा घेतला जात असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.
मोठ्या लोकांना वाचवण्यासाठी अक्षयचा खून झाला. त्याची हल्ल्याची हिंमत नव्हती. निवडणुक डोळ्यासमोर आहे त्यासाठी अक्षयचा खून झाला. याची एसआयटी चौकशी करावी अशी अक्षय शिंदेंच्या कुटुंबियांच्या वकिलांनी न्यायालयात मागणी केली. सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करणाऱ्या 'देवाभाऊ'चा स्क्रीन शॉट वकिलांनी कोर्टात सादर केला. अशा पद्धतीच्या घटनांमुळे आपण पोलिसांना अशा पद्धतीच्या गोष्टी करण्यासाठी सपोर्ट करतो असा अर्थ निघतो. मग कायदा आणि सुव्यवस्था कशासाठी आहे? असा प्रश्न अक्षय शिंदेच्या वडिलांच्या वकिलांनी विचारला.
चकमकीबाबत माहिती देताना सरकारी वकिलांनी दावा केला की, आरोपीने अचानक अधिकाऱ्याच्या कमरेत खोचलेलं पिस्तुल खेचलं आणि तीन राऊंड फायर केले. यावर उच्च न्यायालयाने हे समजणं थोडं कठिण वाटतंय असं म्हटलं. घटनेच्या वेळी त्या गाडीत चार पोलीस अधिकारी होते. एक वरिष्ठ अधिकारी होता. ते सगळे पूर्णपणे प्रशिक्षित होते. त्यात एक एन्काउंटर केलेला पारंगत अधिकारी होता. या सर्वांवर आरोपी वरचढ ठरून पिस्तूल हिसकावू शकतो? एन्काऊंटरची व्याख्या वेगळी आहे हा एन्काऊंटर कसा असू शकतो असा सवाल न्यायालयाने विचारला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.