Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची 'कॅट'मध्ये धाव पुढील सुनावणी पर्यंत बदलीला स्थगिती

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची 'कॅट'मध्ये धाव
पुढील सुनावणी पर्यंत बदलीला स्थगिती



पुणे : खरा पंचनामा

केवळ सात महिन्यांच्या आत बदली केल्याने पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी या बदली विरोधात तातडीने केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (कॅट) मध्ये धाव घेतली. देशमुख यांच्या अर्जाची तातडीने सुनावणी होऊन न्यायाधिकरणाचे सदस्य जस्टीस एम जी सेवलीकर आणि संतोष मेहरा यांनी या बदलीला स्थगिती दिली आहे.

पंकज देशमुख यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागातून ३१ जानेवारी २०२४ रोजी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली होती. ही सर्वसाधारण बदली होती. त्यानंतर आता केवळ ७ महिन्यांमध्ये त्यांची मुंबईचे पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. मध्यावधी काळात बदली करताना त्यामागे कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची पुढील सुनावणीपर्यंत बदली करु नये असा आदेश न्यायाधिकरणाने दिला आहे. या दाव्याची पुढील सुनावणी १९ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहे.

आय टी अभियंता असलेले पंकज देशमुख हे महाराष्ट्र केडरचे २०११ चे बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. देशमुख यांनी अमरावती ग्रामीणमधून आपल्या पोलीस सेवेला सुरुवात केली. त्यानंतर नांदेड, अहमदनगर, उस्मानाबाद, सातारा येथे त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून काम केले. पुणे शहरात वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त तसेच परिमंडळ ४ चे उपायुक्त म्हणून त्यांनी काम केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.