तब्बल 10 वेळा झाले बाबा सिद्दीकींच्या हत्येचे प्रयत्न!
मुंबई : खरा पंचनामा
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी मुंबईत बिश्नोई गँगने गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर काही वेळातच मुंबई पोलिसांना आरोपींना अटक केली आहे. दरम्यान या आरोपींच्या चौकशी दरम्यान त्यांनी पोलिसांसमोर अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबा सिद्दीक यांची हत्या करणाऱ्या हल्लेखोरांनी गेल्या महिनाभरात वांद्रे आणि आसपासच्या परिसरात 10 हून अधिक वेळा सिद्दीकी अयशस्वी प्रयत्न केले होते, असे पोलिसांनी सांगितले.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "हल्लेखोरांना बाबा सिद्दीकी यांच्यावर खेरवाडी येथील त्यांचा मुलगा झीशानच्या कार्यालयाजवळ ठार मारण्याचे सांगण्यात आले होते कारण तो मोकळा परिसर आहे." याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
"हल्लेखोरांनी या दहाही वेळा सिद्दीकी यांना मारण्याचे केलेले प्रयत्न अपयशी ठरले कारण, प्रत्येकवेळी काहीतरी अडचणी आल्याने त्यांना त्याच्यावर गोळीबार करण्याची संधी मिळाली नाही," असेही पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी मंगळवारी या प्रकरणातील आणखी एक आरोपी हरिशकुमार निषाद (२४) याला उत्तर प्रदेशातील कैसरगंज येथून अटक केली आहे. यापूर्वी या प्रकरणातील 4-5 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान या प्रकरणात, गोळीबाराच्या ठिकाणापासून सुमारे 100 मीटर अंतरावर पोलिसांना एक काळी पिशवी सापडली, जी कदाचित आरोपींनी फेकली असावी. यात एक पिस्तूल आणि काही कागदपत्रे आहेत. या पिस्तुलाचा वापर बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे. आता पोलिसांनी ही बॅग आणि पिस्तूल जप्त केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.