Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विधानसभेसाठी पवारांचे संभाव्य 40 शिलेदार ठरले!

विधानसभेसाठी पवारांचे संभाव्य 40 शिलेदार ठरले!



मुंबई : खरा पंचनामा

राज्यात आता महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांकडून तसा दावा केला जात आहे.

महायुतीच्या जागावाटपाची चर्चा वेगाने पुढे सरकत आहे. महाविकास आघाडीकडूनही वेगात हालचाली सुरू झाल्या आहेत. जागावाटप अंतिम टप्प्यात असून काही उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचेही जवळपास ४० संभाव्य उमेदवार निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे. अद्याप या उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र तिकीट याच शिलेदारांना मिळेल असे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. ४० उमेदवारांची यादी असून यामध्ये कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असणार? याबाबतची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष संभाव्य उमेदवार यादी -
इस्लामपूर- जयंत पाटील, तासगाव कवठे महांकाळ - रोहित पाटील, शिराळा- मानसिंग नाईक, उत्तर कराड- बाळासाहेब पाटील, कोरेगाव- शशिकांत शिंदे, फलटण - दीपक चव्हाण, माण खटाव- प्रभाकर देशमुख, शिरुर- अशोक पवार, जुन्नर - सत्यशील शेरकर, इंदापूर- हर्षवर्धन पाटील, आंबेगाव- देवदत्त निकम, वडगाव शेरी- बापू पठारे, दौंड- रमेश आप्पा थोरात, माळशिरस - उत्तमराव जानकर, कर्जत जामखेड- रोहित पवार, काटोल - अनिल देशमुख, विक्रमगड- सुनील भुसारा, घनसावंगी - राजेश टोपे, बीड- संदीप क्षीरसागर.

मुंब्रा - जितेंद्र आव्हाड, जिंतूर- विजय भांबळे, अहेरी- भाग्यश्री अत्राम, सिंदखेड राजा- राजेंद्र शिंगणे, उदगीर- सुधाकर भालेराव, घाटकोपर पूर्व- राखी जाधव, परळी- राजाभाऊ पड, लक्ष्मण पवार - गेवराई, आष्टी- भीमराव धोंडे, केज- पृथ्वीराज साठे, माजलगाव- रमेश आडसकर, राहुरी- प्राजक्त तनपुरे, देवळाली- योगेश घोलप, दिंडोरी - गोकुळ झिरवाळ, मुक्ताईनगर - रोहिणी खडसे, जामनेर - गुलाबराव देवकर, अकोला- अमित भांगरे, पारनेर - राणी लंके, खानापूर - सदाशिव पाटील, चंदगड- नंदाताई बाभूळकर, इचलकरंजी- मदन कारंडे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.