Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तमन्ना भाटिया 'ईडी'च्या रडारवर, तब्बल 8 तास कसून चौकशी

तमन्ना भाटिया 'ईडी'च्या रडारवर, तब्बल 8 तास कसून चौकशी



नवी दिल्ली : खरा पंचनामा

बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी कसून चौकशी केली. तमन्नाची गुवाहाटी येथील ईडी कार्यालयात तब्बल ८ तास चौकशी सुरु होती. आता अभिनेत्रीच्या चौकशीनंतर कोणती गोष्ट समोर येईल याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

रिपोर्टनुसार, HPZ अॅपवर इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल सामने बेकायदेशीरपणे पाहण्याचा प्रचार केल्याच्या आरोपावरून तमन्नाला ईडीने समन्स पाठवले होते. तमन्ना भाटियाने HPZ ॲपवर IPL पाहण्याची जाहिरात केली होती. या अॅपच प्रमोशन केल्याचा आरोप तमन्नावर आहे. तपास यंत्रणेने बोलावल्यानंतर तमन्ना तिच्या आईसोबत गुवाहाटीला पोहोचली होती.

याआधीही बेटिंग अॅपमध्ये प्रमोशनसाठी अनेक सेलिब्रिटींना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. यामध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. गेल्या वर्षी महादेव अॅप प्रकरणात अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. या अॅपच्या जाहिरातींमध्ये रणबीर आणि श्रद्धा दोघेही दिसले होते. या अॅपमुळे रणबीर आणि श्रद्धाशिवाय कॉमेडियन कपिल शर्मा, हुमा कुरेशी यांनाही बोलावण्यात आले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.