Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

स्वामी समर्थांच्या दरबारात डिजिटल मिडियाची कृतज्ञता! राजा मानेंचा मंदिर समिती, अन्नछत्र, अक्कलकोट तालुका डिजिटल मिडियाने केला सत्कार

स्वामी समर्थांच्या दरबारात डिजिटल मिडियाची कृतज्ञता!
राजा मानेंचा मंदिर समिती, अन्नछत्र, अक्कलकोट तालुका डिजिटल मिडियाने केला सत्कार



अक्कलकोट : खरा पंचनामा


कोजागिरी पौर्णिमा दिनी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी श्री. स्वामी समर्थांच्या दरबारात दर्शन घेत राज्यातील डिजिटल मिडियाचे प्रश्न मार्गी लागत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष अमोल राजे भोसले व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष मारुती बावडे यांनी श्री. स्वामी समर्थांची प्रतिमा व प्रसाद देवून सत्कार केला.

याप्रसंगी डिजिटल मिडिया संघटनेचे स्वामीराव गायकवाड राजेश जगताप शिवानंद फुलारी सिद्धू पुजारी हे पदाधिकारी तसेच लोकमतचे तालुका प्रतिनिधी शिवानंद फुलारी, मुंबईचे उद्योजक सिध्देश्वर चव्हाण, कुंदन हुलावळे, पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक विजय बोराडे, प्रा. राम तांबट उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.