Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नवी मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले

नवी मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले



नवी मुंबई : खरा पंचनामा

चार लाख रुपयांची लाच घेताना नवी मुंबईतील एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून अटक केली आहे. या घटनेने नवी मुंबईत खळबळ उडाली आहे.

बेलापूर शाहबाज येथील इमारत दुर्घटनेप्रकरणी आरोपीच्या सुटकेसाठी लाच मागण्याचे हे प्रकरण होते. सतीश कदम यांनी यापूर्वीच 14 लाख रुपयांची लाच घेतली होती. आता त्यांनी पुन्हा 12 लाखांची लाखांची लाच मागितली होती. त्यात 5 लाखांची तडजोड झाली आणि 4 लाख रुपये घेताना मंगळवारी अटक करण्यात आली.

यंदा 27 जुलै रोजी बेलापूरच्या सेक्टर 19 मधील शाहबाज गावात चार मजली इमारत कोसळली होती. यात तिघांचा बळी गेला होता. याप्रकरणी एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. इमारत दुर्घटना प्रकरणात दोन बिल्डरांसह एका गुंतवणूकदारावर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.

इमारत दुर्घटनेतील गुंतवणूकदार महेश कुंभार यांना विविध गुन्ह्यात अडकवून त्यांच्यावर गंभीर कलमे लावण्याची धमकी देत तब्बल 14 लाख रुपये त्यांच्या कुटुंबीयांकडून सतीश कदम यांनी उकळले होते. तुझ्या वडिलांना तुरुगात सडत ठेवतो, असे सांगत कुंभार कुटुंबाकडून 50 लाख रुपये मागितल्याची तक्रार महेश कुंभार यांचा मुलगा अजय कुंभार यांनी केली होती. सुरुवातीला 12 लाख रुपये सतीश कदम यांना दिली होती. त्यानंतर कदम यांनी पुन्हा दोन लाखांची लाच मागितली. तेही त्याला दिले. त्यानंतर त्यांनी पुन्हा 20 लाखांची मागणी केली.

कदम वारंवार पैसे मागत असल्याने अजय कुंभार यांनी पोलीस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार करण्यास सांगितले. त्याप्रमाणे 12 लाखांची तडजोड 4 लाखांवर झाली. ही रक्कम घेताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांना त्यांच्याच घरी रंगेहाथ पकडण्यात आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.