हा नेता थेट जेलमधून निवडणुकीच्या रिंगणात, काय आहे भाजप कनेक्शन?
फलटण : खरा पंचनामा
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सध्या उमेदवारांची पळापळ सुरू आहे. तर काहींना अजूनही उमेदवारी मिळण्याची प्रतिक्षा आहे. अशात फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातून एक उमेदवार असा आहे जो सध्या जेलमध्ये आहे.
जेलमधून निवडणूक लढवण्याचा या नेत्याने निर्णय घेतला आहे. गेल्या अडीच वर्षापासून ते जेलमध्ये आहे. विशेष म्हणजे 2019 ची विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपकडून लढवली होती. त्यात त्यांना तब्बल 86 हजार मते मिळाली होती.
फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातून दिगंबर आगवणे हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दिगंबर हे भाजपचे पदाधिकारी होते. त्यांनी 2019 ची निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढवली होती. त्यात त्यांनी जवळपास 86 हजार मते घेतली होती. सध्या ते मनी लॉन्ड्रींग केसमध्ये जेलची हवा खात आहेत. त्यांनी आता जेलमधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फलटण इथे आले होते. त्यावेळी त्यांना पोलिस बंदोबस्तात आणण्यात आले होते. मात्र ते उमेदवारी अर्ज न भरताच निघून गेले. अर्जा बरोबर आवश्यक कागदपत्र नसल्याने त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. त्यानंतर त्यांनी कोर्टाकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नव्याने परवानगी मागितली आहे. त्यांना ती मिळाली असल्याचेही समजते. त्यामुळे आगवणे हे जेलमधून निवडणूक रिंगणात असतील.
मागिल विधानसभा निवडणुकीत आगवणे यांना भाजपने उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिपक चव्हाण यांच्या बरोबर झाला होता. आगवणे यांना जवळपास 30 हजाराच्या फरकाने पराभव स्विकारावा लागला होता. आता ते निवडणूक रिंगणात उतरणार आहे. त्यासाठी गुरुवारी पोलिस बंदोबस्तात फलटण-कोरेगाव विधानसभा निवडणूक कक्षात आगवणे यांनी एन्ट्री झाली. त्यांनी उमेदवारीसाठी प्रशासनाकडून अर्ज खरेदी केला होता. निवडणूक लढवण्यासाठी न्यायालयाकडून त्यांनी परवानगीही घेतली आहे. न्यायालयाने अर्ज भरण्यास परवानगी दिल्याने आगवणे हे अर्ज भरण्यासाठी पोलिस बंदोबस्तात फलटण तहसील कार्यालयात आले होते. पण अपूऱ्या कागदपत्रामुळे तो त्यांना भरता आला नाही.

भाजपचे माजी पदाधिकारी असलेल्या दिगंबर आगवणे यांना कर्ज घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून ते कारागृहात आहेत. भाजप नेते दिगंबर रोहिदास आगवणे यांना 11 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रींग प्रकरणातही ईडीने अटक केली होती. आगवणे हे सध्या कारागृहात मकोका खाली बंद आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.