"बुडत्याला काडीचा आधार या उक्तीप्रमाणे."
मुंबई : खरा पंचनामा
राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक विधानसभेची जोरदार तयारी करत आहेत.
महायुतीमध्ये जागावाटपावरून चर्चा सुरू आहे. प्रत्येक पक्षाकडून अंतर्गत सर्व्ह देखील केले जात आहेत. दरम्यान पुढील आठवड्यामध्ये राज्याच्या विधानसभा निवडणूका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज महायुतीच्या मंत्रीमंडळाची शेवटची बैठक असू शकते. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाकडून रेकॉर्डब्रेक असे ८० निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच राज्य सरकारने काही नवी महामंडळे स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
मंत्रीमंडळ बैठकीत उद्योगपती रतन टाटा यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या बैठकीमध्ये जवळपास ८० निर्णय झाल्याची माहिती दिली. महामंडळ, पत्रकारांसाठी आणि वृत्तपत्रे विक्रेते यांच्यासाठी दोन स्वतंत्र्य महामंडळासही कॅबिनेटमध्ये मान्यता दिली. गोरा कुंभार, कोळी समाज महामंडळाचा प्रस्ताव मागवला आहे. तसेच नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट उत्पादनाची मर्यादा 8 लाखावरुन वाढवून आता १५ लाखांची करण्यात यावी यासंबंधीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. दरम्यान आता जयंत पाटील यांनी ट्वीट करत काही मिनिटांत घेतलेले हे निर्णय सरकारची आगतिकता दाखवत असल्याचा टोला लगावला आहे.
येत्या विधानसभा निवडणुकांचा धसका सत्ताधारी महायुतीने घेतलेला दिसतो. म्हणूनच 'बुडत्याला काडीचा आधार' या उक्तीप्रमाणे महायुती त्रिकुट सरकार वेगवेगळ्या घोषणा करताना दिसत आहे. पुन्हा सत्तेत येणार नसल्याची महायुतीला खात्री झाल्याने मनाला वाट्टेल त्या घोषणा करुन आश्वासने देत आहे. गेल्या काही मंत्रिमंडळ बैठकांतील विशेषतः कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत अवघ्या काही मिनिटांत घेतले गेलेले ८६ निर्णय त्रिकुट सरकारची अगतिकता दर्शवत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.