'साहेब, माझ्या बायकोची लिंग तपासणी करा'
नवऱ्याच्या अजब याचिकेवर कोर्ट संतप्त
दिल्ली : खरा पंचनामा
कोर्टापुढे बऱ्याच वेळा विचित्र आणि अजब मागणी करणाऱ्या याचिका दाखल होत असतात, अशा प्रसंगी न्यायमूर्ती संतप्त होणे सहाजिक असते. असाच एक प्रकार दिल्ली उच्च न्यायालयात घडला आहे.
या प्रकरणात नवऱ्याने स्वतःच्या पत्नीची लिंग तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करणारी रिट याचिका दाखल केली होती. न्यायमूर्तीनी या नवऱ्याला खडे बोल सुनावत ही याचिका फेटाळून लावली. ही बातमी बार अँड बेंचने दिलेली आहे.
एक प्रकरणात पत्नीने नवऱ्याच्या विरोधात घरगुती हिंसाचाराचे आरोप केले आहेत. पण नवऱ्याचे म्हणणे असे होती की पत्नी ही तृतीयपंथी आहे, म्हणजेच ती स्त्री नाही, त्यामुळे ती घरगुती हिंसाचाराचे आरोप करू शकत नाही. याची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी पत्नीची लिंग तपासणी करावी आणि तसे आदेश न्यायालयाने पोलिसांना द्यावेत, अशा मागणीची याचिका दाखल झाली होती. संबंधित जोडप्याचे लग्न २०२० साली झाले आहे. लग्नानंतर आमच्यात कोणतेही शरीरसंबंध आलेले नाहीत, असा दावाही नवऱ्याने केला होता.
न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी या याचिकेवर संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "हा वैवाहिक विषय आहे. रिट पिटिशन खासगी व्यक्तींविरोधात दाखल केली जात नाही. तुम्ही लिंग तपासणीची मागणी करत आहात, तुम्हाला याच्या परिणामांची जाणीव आहे का? या पुढे म्हणजे तुम्ही तुमच्या पत्नीची लिंग तपासणी करा असे म्हणत आहात."
नवऱ्याचे वकील अभिषेक कुमार चौधरी यांनी ही याचिक मागे घेण्याची परवानगी मागितली, आणि याचिका मागे घेतली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.