Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आधीच उल्हास त्यात 'प्रोबेशनरींचा मास', ऐन दिवाळीत क्लेक्टरांचे सुतकी चेहरे अवैध धंदे बंद करण्यासाठी सर्वत्र प्रोबेशनरीच हवेत का?

आधीच उल्हास त्यात 'प्रोबेशनरींचा मास', ऐन दिवाळीत क्लेक्टरांचे सुतकी चेहरे
अवैध धंदे बंद करण्यासाठी सर्वत्र प्रोबेशनरीच हवेत का?



सांगली : खरा पंचनामा

जिल्ह्यात दिवाळीची धामधूम सुरू झाली आहे. सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना ऐन दिवाळीत सांगली उपविभागात मात्र कलेक्टरांसह धंदेवाल्यांचे सुतकी चेहरे दिसत आहेत. त्यामुळे आधीच उल्हास त्यात 'प्रोबेशनरींचा मास' अशी अवस्था असल्याचे चित्र आहे. दरम्यान सांगली उपविभाग वगळता अन्य उपविभागात दिवाळी जोरात साजरी केली जात आहे.

दिवाळीसारख्या आनंदाच्या आणि मंगलमय सणात कलेक्टर, अवैध धंदेवाल्यांसह 'खा' की 'खा' करणारे सांगलीत मात्र सुतकात असल्याचे दिसून येत आहे. याउलट अन्य उपविभागातील सहकाऱ्यांची दिवाळी पाहून सांगलीतील कलेक्टरांची जळत असल्याचे चित्र आहे. 'प्रोबेशनरीं'मुळे प्रमुख धंदे बंद असले तरी कलेक्टर आणि त्यांच्या साहेबांची दिवाळी अन्य मार्गाच्या इन्कममधून निवांत सुरू आहे. मात्र अन्य उपविभागातील सहकारी भेटल्यावर मात्र 'प्रोबेशनरीं'चे नाव पुढे करत सुतक असल्याचा निर्वाळा दिला जात आहे.

काही दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या साहेबांनी दखल घेऊन एका मोठ्या अवैध धंद्यावर कारवाई करायला सांगलीतील काहींना भाग पाडले. साहेब कोल्हापुरात बसून सांगलीतील धंद्यांची माहिती सांगलीतील संबंधितांना देत असतील तर या धंद्यांना नेमके 'अभय' कोणाचे आहे हे उघड गुपित आहे. साहेबांनी जिल्ह्याच्या एका टोकाला असलेल्या भागातील माहिती दिल्यानंतर नाईलाजास्तव ही कारवाई झाली. मात्र सांगली उपविभागाच्या शेजारीच असलेल्या ग्रामीण भागासह सीमावर्ती भागात 'लक्ष्मी'ची 'खणखण' ऐकू येत आहे. अनेक नावाजलेल्या धंदेवाल्यांनी या भागात 'तळ' ठोकल्याचीही चर्चा आहे. आता सांगली शहराजवळच्या शहरासह ग्रामीण भागातील कलेक्टर आणि त्यांना अभय देणाऱ्या प्रभारींवर कोल्हापूरचे साहेब काय कारवाई करतात याकडे लक्ष लागून राहीले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.