हणमंत वडियेची प्रदीप मंडले टोळी हद्दपार
पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
कडेगाव तालुक्यातील हणमंत वडिये येथील प्रदीप मंडले याच्यासह त्याच्या टोळीतील तिघांना दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
हद्दपार केलेल्यांमध्ये टोळीप्रमुख प्रदीप पंढरीनाथ मंडले (वय २७), मयूर मुरलीधर मंडले (वय २३, दोघेही रा. मंडले वस्ती, हणमंत वडिये, ता. कडेगाव), राहुल तुकाराम मदने (वय २३, रा. खेराडे विटा, ता. कडेगाव) यांचा समावेश आहे. या टोळीवर विहीर, तलाव, कालव्यावरील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारी चोरण्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही या टोळीच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या. त्यामुळे कडेगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी या टोळीवर हद्दपारीची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे पाठवला होता. त्याचे अवलोकन करून तसेच त्यावर सुनावणी घेतल्यानंतर अधीक्षक घुगे यांनी या टोळीला सांगली, सातारा जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले.
या कारवाईत एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे, कडेगावचे निरीक्षक संग्राम शेवाळे, अमोल ऐदाळे, दीपक गट्टे, पुंडलिक कुंभार आदींनी भाग घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.