मराठ्यांचा अखेर ठरलं! सांगली विधानसभा लढवणार
चौघांचा उमेदवारी अर्ज भरणार, जरांगेंच्या सांगण्यानुसार पुढील निर्णय
पहा व्हिडिओ
सांगली : खरा पंचनामा
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार सांगली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. सांगली मतदारसंघातून चौघांचे उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत. जरांगे यांच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलासराव देसाई यांनी दिली.
जरांगे यांच्या आवाहनानुसार सोमवारी सायंकाळी मराठा सेवा संघाच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत जरांगे यांच्या आवाहनानुसार विलासराव देसाई, डॉ. संजय पाटील, युवराज शिंदे, अमोल गोटखिंडे या चौघांचे अर्ज भरण्याचा निर्णय घेण्यात आला. जरांगे यांनी सध्या सांगली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. या मतदारसंघातून निवडणूक लढवायची किंवा अर्ज माघारी घ्यायचे याबाबत दि. २९ आक्टोबर रोजी निर्णय घेण्यात येणार आहे. निवडणूक लढवायची असल्यास जरांगे सांगतील त्या उमेदवाराचा अर्ज ठेवण्यात येईल अन्य अर्ज मागे घेण्यात येतील तसेच जरांगे यांनी सूचना दिल्यास सर्व अर्जही माघारी घेण्यात येतील असा निणर्य आजच्या बैठकीत घेण्यात आला.
यावेळी युवराज शिंदे, अनिकेत व संकेत परब, डॉ संजय पाटील, ललिता घाडगे, रेखा पाटील, विजयमला कदम, भारती पाटील, प्रकाश पाटील, शिवाजी गावकर, राजाराम निलंबे, जालिंदर फारणे, जालिंदर साळुंखे, महेश साळुंखे, शंकर शिंदे, भास्कर पाटील, बाळासाहेब पाटील, शुभम गीडे पाटील, बाजीराव पायमल, रामहरी ठोंबरे, विलास देसाई, प्रदीप कार्वेकर, विजय धुमाळ, तानाजी भोसले, दादासो पाटील, सुलोचना पवार, प्रशांत पवार, रवींद्र केसरे, शिवाजी जाधव तसेच मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.