गेल्यावेळी निसटता पराभव झालेल्या 'या' नेत्याला 'जनसुराज्य 'कडून पुन्हा उमेदवारी
हातकणंगले : खरा पंचनामा
गेल्या विधानसभेला हातकणंगलेतून नवखे असतानाही अशोकराव माने यांचा निसटता पराभव झाला. मात्र, त्यांनी पाच वर्षांत मतदारसंघात संपर्कासह विकासकामांचा धडाका लावला आहे. त्यामुळे यंदा जनसुराज्य शक्तीचे उमेदवार अशोकराव मानेच आहेत, असं प्रतिपादन जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी येथे केले. येथे हातकणंगले तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
गतवेळी अशोकराव मानेंना ऐनवेळी उमेदवारी दिली. काही अडचणीमुळे अनेकांनी सहकार्य केले नाही. त्यामुळे निसटता पराभव झाला. पाच वर्षांत अशोकराव माने यांनी ठेवलेला संपर्क आणि वारणा समूहातील पदाधिकाऱ्यांनी काम करण्याचा घेतलेला निर्णय यामुळे अशोकराव माने आमदार होणार हे निश्चित. वारणा परिसरातील गावात एक लाख ३० हजार मते असून ९० हजार मतदान होईल. वारणेचा परीसस्पर्श नसलेले घर दाखवा. त्यामुळे ६० हजार मते माने यांना मिळतील. ४० हजारांचे मताधिक्य मिळेल.
विद्यमान आमदारांनी अन्य आमदारांच्या तुलनेत मतदारसंघाचा विकास केला नाही. त्यामुळे हातकणंगले विधानसभा मतदारसंघ अद्यापही मागासलेलाच आहे. अंबप सह्याद्री शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र माने यांनी स्वागत केलं. पांडुरंग सिद यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक विजयसिंह माने, वडगावचे माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, वारणेचे संचालक प्रदीप देशमुख, सुभाष पाटील, आदी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.