विधानसभेच्या तोंडावर महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ पुन्हा अडचणीत
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा त्यांची पाठ सोडत नसल्याचं दिसून येतंय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह आणखी दोन जणांनी याबाबत एक याचिका दाखल केली आहे.
विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळांच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता आहे. या घोटाळ्यात भुजबळ कुटुंबियांना मिळालेल्या दोषमुक्तीविरोधात दाखल आव्हान याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्याची याचिकाकर्त्यांची मागणी आहे.
9 सप्टेंबर 2021 रोजी एसीबीच्या विशेष न्यायालयाने छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांना दोषमुक्त केलं होतं. मात्र त्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, दीपक देशपांडे यांच्यासह आमदार सुहास कांदे यांच्यातर्फे तीन स्वतंत्र याचिका दाखल करत आव्हान देण्यात आलं होतं.
या याचिकांवर एप्रिलमध्ये न्यायालयाने भुजबळ कुटुंबियांना नोटीसा बजावल्या होत्या. मात्र त्यानंतर सुनावणी थंडावली होती. याच आव्हान याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्यासाठी याचिकाकर्ते आग्रही आहेत. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकांमध्ये भुजबळांच्या मागे या प्रकरणाचा ससेमिरा लागू शकतो.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.