Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी

जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी



मुंबई : खरा पंचनामा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दुपारी पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहे. मात्र, त्याआधीच जयंत पाटील यांनी सोशल मीडिया हँडलवरील आपला डीपी चेंज केला आहे. त्यामुळे, राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यापूर्वी त्यांच्या डीपीवर तुतारी वाजवणारा माणूस हे चित्र होते. मात्र, आता हक्क मागतोय महाराष्ट्र असा आशयाचे डीपी प्रोफाईल केलं आहे. 

जयंत पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारविरुद्ध चांगलच रणशिंग फुंकलं असून शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून ते सरकारच्या धोरणांविरुद्ध भाष्य करत आहेत. पुढील काही दिवसांतच राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. त्यामुळे, राज्य सरकारमधील मंत्री आणि नेतेमंडळी विविध योजना व कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहेत. तसेच, लोकांना शासकीय योजनांची माहिती देत सरकार तुमच्यासाठीच असल्याचं सांगत आहेत. दुसरीकडे विरोधक आक्रमक होऊन सरकारविरुद्ध जनमत तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहे, जागावाटपाच्या चर्चांनी जोर धरला आहे. अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीगाठी घेत आहेत. अशा परिस्थितीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेची घेणार असल्याचे सांगितले असून आज ते पत्रकार परिषदेत काय घोषणा करतात, याकडे राष्ट्रवादीसह राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी जयंत पाटील यांनी ट्विटरर म्हणजे एक्स हॅन्डेलवरील त्यांचे प्रोफाईल चित्र बदलले आहे. हक्क मागतोय महाराष्ट्र अशा आशयाचे आणि वज्रमूठ असलेले प्रोफाईल चित्र त्यांच्या डीपीवर ठेवण्यात आलंय. त्यामुळे, जयंत पाटील यांचा हा नवा डीपी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नवा कॅम्पेन अजेंडा आहे का, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.