राज्यात 21 नोव्हेंबरपासून थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा
पुणे : खरा पंचनामा
उत्तर भारतातून शीतलहरी महाराष्ट्राच्या दिशेने निघाल्या असून, सोमवारी अहिल्यानगरचा पारा 12.6 अंशांवर खाली आला होता. तर जळगाव, महाबळेश्वरचा पारा प्रथमच 13 अंशांवर आला आहे. राज्यात 21 ते 22 नोव्हेंबरपासून थंडीची तीव्र लाट येईल, असा इशारा हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे.
नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवाडा थंडीविनाच गेला. राज्यातील बहुतांश भागांत ढगाळ वातावरण होते. तर काही भागांत पाऊस झाला. त्यामुळे किमान तापमानात 3 ते 7 अंशांनी वाढ झाली. त्यामुळे रात्रीदेखील उकाडा वाढला होता. मात्र, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र निवळताच उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाला.
त्या भागातून महाराष्ट्रात शीतलहरी येण्यास सुरुवात झाली आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात ही राज्ये गारठण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शीतलहरी महाराष्ट्राकडे निघाल्याचे सॅटेलाइट इमेजमध्ये स्पष्ट दिसत आहे.
गेल्या बारा तासांतच राज्यातील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असून, सोमवारी अहिल्यानगरचा पारा राज्यात सर्वांत कमी 12.6 अंशांवर खाली आला होता. यंदाच्या हंगामात नोव्हेंबरमधील हे सर्वांत कमी तापमान ठरले आहे. त्या पाठोपाठ जळगाव 13.2, महाबळेश्वर 13.4, छ. संभाजीनगर 14.4, पुणे 14.5 अंशांवर खाली आले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.