प्रचाराच्या शेवटच्या तासात राहुल गांधींचा 'पोस्टर बॉम्ब'
सर्वांसमोर तिजोरी खोलून भाजपावर 5 मोठे हल्ले
मुंबई : खरा पंचनामा
राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत प्रचारादरम्यान नेतेमंडळी एकमेकांवर गंभीर स्वरुपाचे आरोप करताना दिसतायत. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी हेदेखील यात मागे नाहीत. त्यांनी प्रचाराचे शेवटचे काही तास शिल्लक असताना थेट पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर पोस्टर बॉम्ब टाकला आहे. त्यांनी भर पत्रकार परिषदेत काही पोस्टर्स दाखवून भाजपा आणि विरोधकांना चांगलंच घेरलंय.
1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला 'एक है तो सेफ है' हा नारा लिहिलेला होता. महाराष्ट्रात प्रचारसभेत बोलताना मोदी यांनी अनेक ठिकाणी हा नारा दिला होता. याच नाऱ्याचा उल्लेख करून राहुल गांधींनी भाजपाला घेरलंय. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद चालू असताना मध्येच खुर्चीवरून उठून मंचावर एक तिजोरी आणली. या तिजोरीवर मोदी यांनी दिलेला एक है तो सेफ है हा नारा लिहिलेला होता. थोड्या वेळानंतर त्यांनी ही तिजोरी खोलली आणि त्यातील गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांचा फोटो दाखवला. अदानी आणि मोदी एकत्र मिळून मुंबईच्या लोकांच्या विरोधात निर्णय घेत आहेत, असा दावा केला. तसेच त्यांनी आम्ही सत्तेत आल्यास धारावीच्या लोकांसाठी पुरक असणारा निर्णय घेऊ, असंही त्यांनी जाहीर केलं.
2) मोदींचा एक है तो सेफ है हा मुद्दा मी चांगल्या पद्धतीने समजावून सांगितला आहे. गौतम अदानी, नरेंद्र मोदी आणि अमित शाह एकत्र आहेत. तर गौतम अदानी यामध्ये सेफ आहेत. धारावीतील जनतेचे यात नुकसान होणार आहे.
3) धारावी हा भाग देशातील लघु आणि सूक्ष्म उद्योगांचा महत्त्वाचा भाग आहे. धारावीला एका व्यक्तीसाठी संपवलं जात आहे. नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ है असा नारा दिलाय. मात्र एक कोण आहे आणि सेफ कोण आहे? हाच खरा प्रश्न आहे.
4) सोयाबीनला हमीभाव आणि बोनस देण्यासाठी आम्ही सर्व नियोजन केलेले आहे. आमचा यात अनुभव आहे. आम्ही असेच धोरण छत्तीसगडमध्ये राबवलेले आहे. त्यामुळे आर्थिक दृष्टीने विचार करायचा झाल्यास या धोरणाची अंमबलबजावणी करताना कोणतीही अडचण येणार नाही. त्यासाठी आम्ही सर्व अभ्यास केला आहे.
5) धारावीची जमीन ही तेथे राहणाऱ्या लोकांची जमीन आहे. गेली कित्येक वर्षे हे लोक तेथे राहतात. हा प्रदेश लघु आणि सूक्ष्म उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. अनेक लोक येथे काम करतात. मॅनग्रोव्हच्या जंगलाची जमीन घेतली जात आहे. हे सर्वकाही एका व्यक्तीची मदत करण्यासाठी केले जात आहे. यावरच आमचा आक्षेप आहे. सर्व राजकीय यंत्रणा एका व्यक्तीला मदत करण्यासाठी मोडली-तोडली जात आहे. कंत्राट देण्यासाठी जी पद्धत वापरलेली आहे, त्यावर आम्ही सहमत नाहीयोत. त्यामुळेच धारावीसाठी हा धोका आहे, असं आमचं मत आहे.
6) एकाच व्यक्तीला देशातील विमानतळ, संरक्षण क्षेत्रातील उद्योग दिले जात आहेत, याच व्यक्तीला पोर्ट्स, धारावी, मुंबईचे विमानतळ दिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या व्यक्तीशी जुने नाते आहे. अदानीजी हे मोदी यांच्या मदतीशिवाय करू शकत नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.