Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्य फेकण्याचा प्रयत्न!

नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्य फेकण्याचा प्रयत्न!



अमरावती : खरा पंचनामा

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदार संघातील खल्लार येथे युवा स्वाभिमानचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारार्थ माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचार सभेचे शनिवारी (दि. १६) आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेत जमलेल्या काही विरोधकांनी अचानक गोंधळ घालायला सुरुवात केली आणि नवनीत राणा यांच्या दिशेने खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

शनिवारी रात्री नवनीत राणा या खल्लार येथे प्रचारसभेसाठी गेल्या होत्या. युवा स्वाभिमानचे उमेदवार अरुण बुंदीले यांचा नवनीत राणा प्रचार करत होत्या. ही प्रचार सभा सुरू झाली. त्यानंतर काही वेळाने नवनीत राणा या सभेला संबोधित करण्यासाठी उठल्या. यावेळी सभेत जमलेल्या काही विरोधकांनी अचानक गोंधळ घालायला सुरुवात केली. तसेच, काहींनी नवनीत राणा यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरू केली. यावेळी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही लोकांनी नवनीत राणांच्या विरोधात घोषणाबाजी सुरूच ठेवली.

दरम्यान, गोंधळ थांबत नसल्याने स्वतः नवनीत राणा या त्यांना समजावण्यासाठी जमावाकडे गेल्या. यावेळी काहींनी नवनीत राणा यांच्या दिशेने खुर्ध्या फेकण्याचा प्रयत्न केला. यामुळे सभेत एकच खळबळ उडाली. यावेळी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने नवनीत राणा थोडक्यात बचावल्या. यामुळे या हल्ल्यात त्यांचा सुरक्षारक्षक हा किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेनंतर नवनीत राणा यांना त्यांची सभा आटोपती घ्यावी लागली. या घटनेमुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.